Swargate Bus Depot Marathi News: स्वारगेटप्रकरणातील पीडित तरुणी ते ऐकताच तणावाखाली गेली; दोन जणांची घेतली जातेय मदत
Swargate Bus Depot News: शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे.

Swargate Bus Depot Marathi News
1/11
Swargate Bus Depot Marathi News: स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे.
2/11
मंगळवारी (25 फेब्रुवारी) घडलेल्या अत्याचारावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी पीडितेने त्याला गयावया केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
3/11
सदर प्रकरणी जेव्हा न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी आरोपी दत्ता गाडेच्या वकीलांनी बसमध्ये शारीरिक संबंध दोघांच्या संमतीने झाल्याचा दावा केला.
4/11
या घृणास्पद घटनेनंतरही आरोपीला त्याच्या कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळत आहे.
5/11
पीडित तरुणी आणि आरोपी दत्ता गाडे एकमेकांच्या संपर्कात होते, असा दावाही आरोपीच्या वकिलांनी केला.
6/11
आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी पीडित तरुणीने संमतीने शरीर संबंध ठेवल्याचा दावा केल्यानं पीडित तरुणी तणावाखाली असून त्यासाठी तिला त्यासाठी दोन समुपदेशकांची मदत देण्यात आलीय.
7/11
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यात असल्याने तिच्या समुपदेशनासाठी दोन समुपदेशकांची मदत घेण्यात आली.
8/11
पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
9/11
स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टॅंडवर जाऊन सावज शोधायचा अशी माहिती समोर आली.
10/11
आरोपीने यापूर्वीही एकदा बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.
11/11
मात्र, या प्रकरणातील पीडितेने घाबरून केवळ चोरीची तक्रार दिली होती, अशी माहितीही समोर आली आहे.
Published at : 03 Mar 2025 02:01 PM (IST)