Satara crime news: साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
Crime news Satara: साताऱ्यातील सोमंथळीत क्रूरतेचा कळस! अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे. पहिला प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला महिलेने संपवलं.

Satara crime news
1/8
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2/8
फलटण तालुक्यातील सोमंथळी येथून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे.
3/8
अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
4/8
इतकेच नव्हे, तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
5/8
सतीश उर्फ आप्पा दादासो दडस, असं हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. अनैतिक प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे.
6/8
या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, एका महिलेसह तिच्या प्रियकराला आणि नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात एकूण तीन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
7/8
पोलिसांनी घटनास्थळावर शोधमोहीम राबवून मृतदेहाचे नदीत आणि शेततळ्यात फेकलेले तुकडे जमा केले.
8/8
पहिला प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला महिलेने संपवलं.
Published at : 23 Jan 2026 09:23 AM (IST)