Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: संतोष देशमुख प्रकरणाची पहिल्यांदाच सुनावणी झाली; वाल्मिक कराडचे वकील ब्लॅक गॉगल लावून आले, म्हणाले...
Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज (12 मार्च) केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली.

Walmik Karad
1/8
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणी आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली. या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते.
2/8
सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपी व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते. यावेळी बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली.
3/8
आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील राहुल मुंडेंनी केला. यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी बाजू मांडली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील युक्तिवाद केला.
4/8
26 मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल, असं सांगण्यात आले. यानंतर न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार असल्याचे सांगितले.
5/8
सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?- न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी ब्लॅक गॉगल लावून माध्यमांशी संवाद साधला.
6/8
न्यायालयात या कामाचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्या दोषारोप पत्रात बरेच कागदपत्रे आहे, ते आरोपींना मिळणं गरजेचं आहे, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणाले.
7/8
कागदपत्रे मिळण्याबाबत आज आम्ही मागणी केली आहे, ते पुढच्या सुनावणीमध्ये मिळतील, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले.
8/8
वाल्मिक कराडने वकील बदलला- संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीला उज्वल निकम उपस्थित नव्हते. आज सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडची बाजू विकास खाडे यांनी मांडली. आतापर्यंत अशोक कवडे हे वाल्मिक कराडचे वकील म्हणून काम पाहत होते. मात्र यापुढे कोल्हापूर येथील वकील विकास खाडे हे वाल्मिक कराडचे काम पाहणार आहेत.
Published at : 12 Mar 2025 01:18 PM (IST)