Pune Budhwar Peth News: पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांकडून सर्च ऑपरेशन; कारवाईनंतर धक्कादायक प्रकार उघड
Pune Budhwar Peth News: पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात पोलिसांनी छापेमारी केली.
Continues below advertisement

Pune Budhwar Peth News
Continues below advertisement
1/8
Pune Budhwar Peth News: बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले होते.
2/8
पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात पुणे पोलिसांनी काल रात्री छापेमारी करत कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली.
3/8
सदर कारवाईदरम्यान वेश्याव्यवसाय करत असलेल्या 11 महिला बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून उघड झाले.
4/8
पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात विटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
5/8
तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Continues below advertisement
6/8
पुण्यातील रेड लाईट परिसरात यापूर्वीही बांगलादेशी महिलांना आणल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
7/8
दरम्यान, पोलिसांनी राबवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा एकदा 11 बांगलादेशी महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
8/8
पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. संबंधित प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Published at : 18 Feb 2026 12:29 PM (IST)