महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेले अनेक दिवसापासून सुरू असलेले अवैध कत्तलखाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले आहेत.

Pathardi Slaughterhouse encroachment
1/7
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेले अनेक दिवसापासून सुरू असलेले अवैध कत्तलखाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले आहेत.
2/7
तिसगाव येथे गेल्या काही दिवसापासून गोवंशची हत्या केली जात असल्याचे पोलीस कारवाईत सातत्याने पुढे आले असून हिंदू समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता पोलिसांकडून तातडीने ही कारवाई करण्यात आली.
3/7
तिसगाव येथे दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून तिसगाव येथील कत्तलखाने भुई सपाट करण्याची भूमिका ग्रामपंचायतने घेतली. यासंदर्भात ग्रामपंचायतने पोलीस प्रशासन, पंचायत समिती, तहसील यांना देखील लेखी निवेदन दिले होते.
4/7
तिसगाव येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद व्हावेत यासाठी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री स्वतः उपोषणास बसणार असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली होती.
5/7
जर आदिनाथ महाराज शास्त्री या कत्तलखाण्याच्या विरोधात उपोषणाला बसले तर तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं हे लक्षात आलं.
6/7
त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेत आज तिसगाव येथील सर्व अनाधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त करण्यास मदत केली. यावेळी, हिंदू समाजातील युवकांचा पुढाकार दिसून आला.
7/7
जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे कत्तलखाने जमिनदोस्त करण्यात आले असून सध्या तालुक्यात ह्याची चर्चा होत आहे. तसेच, गोवंश हत्येचं समर्थन होऊच शकत नाही, असेही युवक म्हणत आहेत.
Published at : 05 Jan 2026 04:12 PM (IST)