Palghar : पालघरमध्ये घरगुती LPG चा काळाबाजार करणाऱ्यांवर छापा, 91 भरलेले सिलेंडर आणि 75 रिकामे सिलेंडर हाती, कारवाईनं खळबळ
Palghar LPG Raid : पालघर जिल्ह्यात घरगुती वापराच्या सिलेंडरमधील एलपीजी व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये रिफील करत काळाबाजार करणाऱ्यावंर कारवाई करण्यात आली आहे.

पालघरमध्ये एलपीजीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
1/6
पालघर : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं देशभरात एलपीजी गॅसचा पुरवठा सरकारकडून सावधपणे केला जात आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भागात गॅस बुकिंगसाठी अनुक्रमे 25 आणि 45 दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला आहे. मात्र याचवेळी काही ठिकाणी एलपीजीचा काळाबाजार केला जात असल्याचं समोर आलं आहे.
2/6
पालघर जिल्ह्यात काळाबाजाराचं एक प्रकरण समोर आलं आहे. पालघर जिल्ह्यात आज दुपारी मोठी कारवाई करण्यात आली आहे.वाडा तालुक्यात गॅसच्या काळाबाजाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.
3/6
राज्य दक्ष पथक, मुंबई यांच्या धडक छाप्यात धक्कादायक माहिती समोर आली. घटनास्थळी घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरला जात होता. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये एलपीजी भरुन ते ठाण्याला पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
4/6
14 किलो गॅस 5 आणि 19 किलो सिलेंडरमध्ये भरून अवाजवी दराने विक्री केली जात होती.कारवाईदरम्यान 91 भरलेले सिलेंडर, 75 रिकामे सिलेंडर, 3 इलेक्ट्रिक मोटर्स आणि 6 वजन काटे जप्त करण्यात आले आहेत.
5/6
या प्रकरणी देवा शंकर पवार, धनराज माखने, कैलास राठोड, प्रवीण पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6/6
मुसारणे परिसरातील हा काळाबाजार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Published at : 28 Mar 2026 11:00 PM (IST)