Mumbai Goregaon News : गोरेगावच्या संतोषनगरमधील राड्याला नवं वळण; दंगलखोराकडे ड्रग्ज सापडलं; घरावर बुलडोझर चालवला
Mumbai : दिंडोशी संतोषनगर परिसरात ज्या लोकांनी शोभायात्रा हल्ला केला ते घरात ड्रग विकत होते. असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्या घराची झडती घेतलानंतर तिथे अर्धा किलो ड्रग्स आढळून आलाय.
Continues below advertisement

Mumbai Goregaon News
Continues below advertisement
1/9
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगाव पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर परिसरामध्ये दोन गटात झालेल्या राड्याप्रकरण आता काहीसं हिंसक होत असल्याचे चित्र आहे.
2/9
मरियम्मा देवीचा शोभायात्रा दरम्यान, काल (5 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास राडा झाला. दोन गटात झालेल्या या वादानंतर तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीय. या हाणामारीत तिन ते चार जण गंभीर तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
3/9
या घटनेनंतर आज पुन्हा या परिसरात दंगेखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने दिंडोशी संतोष नगर परिसरातील दंगेखोरांच्या अनधिकृत घरांवर जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात येत आहे.
4/9
हि घरं अनधिकृत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर हि कारवाई करण्यात येत असल्याचे बोललं जात आहे.
5/9
यातील हल्लाखोरांचा घरावर देखील जेसीबी कारवाई करण्यात आली आहे. तर ड्रग्ज विकणाऱ्या लोकांनीच हा हल्ला केल्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी एका गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
Continues below advertisement
6/9
परिणामी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एका गटाच्या आग्रही मागणी आणि आक्रमक पावित्र्यानंतर पुन्हा एकदा पालिकेचा जेसीबी संतोष नगर परिसरात दाखल झाला आहे. पालिकेचे कर्मचारी हातोडा घेऊन आले आहे, त्यासोबत बुलडोजर देखील ॲक्शन मोडमध्ये आहे.
7/9
त्यामुळे आता पुन्हा काही हल्लेखोरांच्या घरांवर कारवाई केली जाणार असल्याची शक्यता आहे. जेसीबी कारवाईसाठी येताच जमावाने मोठा जल्लोष करत जेसीबीचे यावेळी स्वागत केलंय. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
8/9
दरम्यान याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी प्रतिक्रिया देत हि कारवाई योग्य असल्याचे सांगितलंय. दोषींवर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
9/9
अशातच, या प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. दिंडोशी संतोषनगर परिसरात ज्या लोकांनी शोभायात्रा हल्ला केला ते घरात ड्रग विकत होते. असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्या घराची झडती घेतलानंतर तिथे अर्धा किलो ड्रग्स आढळून आलाय.
Published at : 06 Apr 2026 02:50 PM (IST)