Mumbai Crime Malad Railway station: धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
Mumbai Crime Malad Railway station: मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका महाविद्यालयीन प्राध्यापकाची पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आली.

Mumbai Crime Malad Railway station
1/8
मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री एका व्यक्तीची पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आली.
2/8
आलोक सिंह असे मृत व्यक्तीचे नाव असून तो विलेपार्ले येथील एन.एम(NM) महाविद्यालयात प्राध्यापक होता.
3/8
ट्रेनमधून धक्का लागल्यामुळे आलोक सिंह आणि मारेकऱ्यामध्ये भांडण झाले. याच रागातून समोरच्या व्यक्तीने आलोक सिंह यांच्या पोटात चाकू खुपसला.
4/8
प्रोफेसर आलोक सिंग विलेपार्लेमधून ट्रेन पकडून मालाड रेल्वे स्टेशनवर उतरले.
5/8
मालाड रेल्वे स्थानकात उतरताना शेजारच्या व्यक्तीला धक्का लागला याच रागाचा भरामध्ये त्या व्यक्तीने आलोक सिंह यांच्यावर चाकूने हल्ला केला.
6/8
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आणि तांत्रिक तपासाचे आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
7/8
मालाड रेल्वे स्थानकातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
8/8
या घटनेमुळे रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Published at : 25 Jan 2026 07:19 AM (IST)