एक्स्प्लोर
Dhule Crime : धुळे हादरलं, दुचाकीवरुन येत तरुणांचा हवेत गोळीबार, सोने घेऊन आलेल्या व्यापाऱ्याची बॅग पळवली, पोलीस तपास सुरु
Dhule Crime News :धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळ हवेत गोळीबार करत व्यापाऱ्याची बॅग हिसकावली आहे. तीन तरुणांनी दुचाकी वर येत हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे.
धुळे क्राईम न्यूज
1/5

धुळे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सावरकर पुतळ्याजवळ हवेत गोळीबार करत व्यापाऱ्याची बॅग हिसकावल्याची घटना घडली आहे.
2/5

मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यतील सावरकर पुतळ्याजवळ तीन तरुणांनी दुचाकीवरुन येत हवेत गोळीबार केला.
3/5

नंदूरबार जिल्ह्यतील शहाद्यातून सोनं घेऊन धुळ्यात व्यापारी आले होते. धुळे शहरात व्यापारी येताच शहरातील देवपूर परिसरात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याजवळील चौकात बसमधून आलेल्या व्यापाऱ्यांकडून बॅग लांबवली.
4/5

धुळे शहरात गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
5/5

धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळ सोने घेऊन आलेल्या व्यापाऱ्यासोबत काय घडलं याची माहिती जाणून घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देवपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले असल्याची माहिती आहे.
Published at : 24 Jul 2025 12:08 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र


















