एक्स्प्लोर
Crime News: बॉयफ्रेंडसाठी पतीला पुरलं, दृश्यम स्टाईल संपवलं; नालासोपाऱ्यात बायकोचा खतरनाक कांड, नेमकं काय घडलं?
Crime News: नालासोपाऱ्यात पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या करून दृश्यम स्टाईलने मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Crime News
1/8

मुंबईनजीकच्या नालासोपाऱ्यात पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या करून दृश्यम स्टाईलने मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2/8

पेल्हार पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला पुणे येथून अटक केली आहे.
3/8

हत्या झालेल्या पतीचे नाव विजय चौहान असून, आरोपी पत्नीचे नाव गुडिया चमन चौहान आणि तिच्या प्रियकराचे नाव मोनू विश्वकर्मा आहे. या दाम्पत्याला चेतन चौहान नावाचा आठ वर्षांचा मुलगा देखील आहे.
4/8

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती हा गुडिया आणि मोनू यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे दोघांनी मिळून विजयची निर्घृण हत्या केली.
5/8

ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली असून, मृतदेह घरातच गुपचूप पुरून त्यावर टाईल्स बसवण्यात आल्या.
6/8

विशेष म्हणजे मृताच्या भावाकडूनच टाईल्स लावून घेतल्या गेल्याचे समोर आले आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी गुडियाच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मेसेज आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातून या खुनाचा भयंकर उलगडा झाला.
7/8

सध्या आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून, तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा फरार आहे.
8/8

पोलिसांनी मृतदेह घरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे नालासोपाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Published at : 23 Jul 2025 08:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















