पृथ्वी शॉला क्लीन बोल्ड करणारी प्राची सिंह कोण आहे? एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा
प्राची सिंह एक टीव्ही अभिनेत्री असून ती कलर्स चॅनेलच्या लोकप्रिय टीव्ही सीरियल 'उडान सपनों की' मध्ये दिसली आहे. या शोमध्ये प्राची 'समीर'च्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. प्राची केवळ अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्कृष्ट बेली डान्सर देखील आहे. प्राची सिंगच्या सोशल मीडिया अकाउंटवर बेली डान्सची अनेक व्हिडिओ पोस्ट आहेत, ज्यांना चाहत्यांनी पसंत केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्राची सिंह पृथ्वी शॉच्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर कमेंट करत आहे. पृथ्वी शॉही तिला रिप्लाय करायला विसतर नाहीये. दोघांचा हा कमेंट-कमेंटचा खेळ पाहून लोक अंदाज लावत आहेत की दोघांच्यात मैत्रीपेक्षा आणखी काहीतरी आहे. मात्र प्राची आणि पृथ्वी दोघांकडून याबाबत काहीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
सध्या पृथ्वी शॉला त्यांच्या इन्स्टाग्रामवर अनेक कमेंट येत आहेत, ज्यामध्ये तो अभिनेत्री प्राची सिंहला डेट करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
टीम इंडियाचा नवोदित खेळाडू पृ्थ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळणार आहे. सध्या पृथ्वी एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
क्रिकेटर्स आणि ग्लॅमरचं जुनं नातं आहे. आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटू बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आहेत आणि काहींना लगीनगाठही बांधली. शर्मिला टागोर-नवाब पतौडींपासून अनुष्का-विराट यांच्यापर्यंत ही यादी आहे. या यादीत आणि एक नाव जोडलं जाणार असल्याची चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -