Covid-19 Vaccination: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी, खासदार शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांनी घेतली लस
दिल्लीतील एम्समध्ये केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही कोरोना लस लस घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लस घेतली आहे. ही लस मिळाल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट केले की आज कोरोना लसीचा पहिला डोस मी मुंबईच्या सर जेजे हॉस्पिटलमध्ये घेतला.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस दिला. ही लस घेत पटनायक यांनी फोटो ट्विट करुन लिहिले की, “आज कोविड 19 ची लस मिळाली. ही लस लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वैज्ञानिकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मी आभारी आहे.''
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही कोरोना लस घेतली. आज नितीशकुमार यांचा वाढदिवस आहे. नितीशकुमार यांना पाटण्यातील आयजीआयएमएस येथे लस देण्यात आला.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही चेन्नईत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहन केले. उपराष्ट्रपतींनी देखील लस घेताना त्यांचा फोटो ट्विट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानीतील एम्स रुग्णालयात कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस टाचून घेतला. पुडुचेरी येथील सिस्टर पी निवेदा यांनी त्यांना हा डोस दिला. पंतप्रधानांनी आसामी दुपट्टा घेतला होता आणि कोणतीही सुरक्षा न घेता एम्समध्ये पोहोचले. दुसरा डोस पंतप्रधान मोदींना 28 दिवसांनी दिला जाईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -