Corona Vaccine | गुड न्यूज, कोविशील्ड लस मुंबईमध्ये दाखल!
देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत झाला आहे. त्यामुळे आज कोविशील्ड लसीचा पहिला साठा शहरात दाखल झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
बीएमसीच्या एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा साठा ठेवला असून 16 जानेवारीला लसीकरण केंद्रावर पाठवली जाईल.
मुंबईकरांची आजची सकाळ खऱ्या अर्थाने गुड ठरली. कारण आज पहाटे कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला.
सीरम इन्स्टिट्यूटकडून मुंबई महापालिकेला कोविशील्ड लसीचे 1 लाख 39 हजार 500 डोस मिळाले आहेत.
कोविड-19 आजारावरील 'कोविशील्ड' लसीचा पहिला साठा पहाटे साडेपाच वाजता मुंबईत पोहोचला.
मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूमधून मुंबईत आणण्यात आली.
महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.