Corona Vaccine | गूड न्यूज! पुण्याहून सिरमच्या 'कोविशिल्ड' लसीच्या वितरणाला सुरुवात

त्यानंतर ते कार्गो विमानांमधून देशभरातील 13 ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे विमानतळावरुन लस घेऊन जाणारी फ्लाइट दिल्लीसाठी रवाना झाली आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे.
पुणे झोन-5 च्या डीसीपी नम्रता पाटील यांनी बोलताना सांगितलं की, कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे.
सीरमची लस पुणे विमानतळावरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकला सहा कोटींहून अधिक लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. त्यानंतर सीरमच्या वतीनं लसींच्या वितरणास सुरुवात करण्यात आली.
पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली.
आजपासून सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचं वितरण करण्यास सुरुवात केली आहे.
आज दिवसभरात अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत.
लस घेऊन जाणारा ट्रक विमानतळावर पोहचल्यानंतर लसींचे बॉक्स उतरवून घेण्यात आले. त्यानंतर ते कार्गो विमानांमधून देशभरातील 13 ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत.
सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. तिथून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -