चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त भिमाशंकर येथील शिवलिंगावर रंगीबेरंगी फुलांनी सजावट!
नाजिम मुल्ला, एबीपी माझा | 17 Aug 2020 10:17 AM (IST)
1
श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार असून कोरोना संकटामुळे सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहेत.
2
यंदा कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे भिमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे.
3
इतिहासात पहिल्यांदाच श्रावण मासात भिमाशंकर परिसर भक्तांविना ओस पडला आहे.
4
दरवर्षी श्रावणी सोमवारी लाखो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी भिमाशंकर येथे हजेरी लावतात.
5
पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत भगवान शंकराची महाआरती आणि महाभिषेक पार पडला.
6
भिमाशंकर येथील शिवलिंगावर विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती.
7
आज श्रावण मासातील शेवटचा सोमवार असून यानिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे महाआरती पार पडली.