PHOTO | धक्का देणं ही माझी सवयच: छत्रपती उदयनराजे भोसले
या प्रसंगी खासदार उदयनराजेंनी सिंघम चित्रपटातील 'अभी के अभी' हा डायलॉग मारला. या बोगद्याची पाहणी करताना त्यांनी आपली कॉलर उडवत खास स्टाईल मारली.
सातारकर व जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत दिलेले प्रेम व आशीर्वाद याची तुलना कोणत्याही गोष्टीशी आम्ही करू शकत नाही हेच प्रेम व आशीर्वाद आम्हास आपली मनोभावे सेवा करण्याची ताकद देते.
सातारा शहराची मोठी वाहतूक कोंडी या भव्य प्रकल्पामुळे सुरळीत होण्यास मदत होणार आहे हा ग्रेडसेपरेटर आजपासून जनतेच्या सेवेत आम्ही मोठ्या आनंदाने सुपूर्त करत आहोत असे उदयनराजे म्हणाले.
खासदार उदयनराजेंनी यांनी सातारा शहरवासीयांसाठी स्वप्नवत व महत्वकांक्षी असलेला प्रकल्प छत्रपती संभाजी महाराज ग्रेड सेपरेटर चे उद्घाटन करुन सर्वांना धक्का दिलाय. धक्के देणं ही माझी सवयच असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय.
खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यातील मध्यवर्ती भागातील संभाजी महाराज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन अचानकपणे केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याची जोरदार चर्चा होती.