PHOTO | वारकऱ्यांविना ओस पडलेली चंद्रभागा
गोविंद शेळके, एबीपी माझा | 01 Jul 2020 05:30 PM (IST)
1
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये 12 ते 15 लाख लोक येतात यावर्षी मात्र कोरोनामुळे अवघी पंढरपूर नगरी सुनी सुनी वाटत होती.
2
एकादशीला गर्दी नाही असा रस्ता पंढरपूरमध्ये शोधून सुद्धा सापडला नसता आज मात्र सगळीकडे निरव शांतता पाहायला मिळत होती.
3
चंद्रभागेला पाणी होतं मात्र स्नान करण्यासाठी वारकरी मात्र नव्हते.
4
आषाढीला विठ्ठल मंदिर परिसरामध्ये हजारो वारकरी थांबायचे तो हा परिसर आज निर्मनुष्य पाहायला मिळतो.
5
आषाढी वारी निघाली असती तर आज चंद्रभागेला ही वारकऱ्यांचा महापूर आला असता.
6
आषाढीला आज वाळवंटामध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहत नाही. मात्र ते हे चंद्रभागाचे वाळवंट आज ओस पडलं होतं. (सर्व फोटो- गणेश मिटकरी - सोलापूर पोलीस)
7
हातवर मोजण्याइतके वारकरी आज चंद्रभागेतीरी दिसत होते.