Union Budget 2026 : निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार; नोकरदारांना अर्थसंकल्पातून कोणतं गिफ्ट मिळणार?
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत.

Union Budget 2026
1/7
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) आज संसदेत सादर केला जाणार आहे.
2/7
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत
3/7
निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे.
4/7
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल.
5/7
या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.
6/7
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
7/7
सोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कररचनेत कोणतं गिफ्ट मिळणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. (Union Budget 2026)
Published at : 01 Feb 2026 09:35 AM (IST)