IPO : टाटा ग्रुपच्या कंपनीचा आयपीओ येणार, कागदपत्रं सेबीकडे सोपवली, 10 बँकांवर सोपवली मोठी जबाबदारी
Tata Group IPO: टाटा ग्रुपची कंपनी टाटा कॅपिटलचा 15 हजार कोटींचा आयपीओ येणार आहे. यासंदर्भातील कागदपत्रं सेबीकडे सोपवण्यात आली आहेत.

टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार
1/6
Tata Group IPO: टाटा ग्रुपची कंपनी टाटा टेक्नोलॉजीज या कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये आला होता. यानंतर टाटा ग्रुपच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार आहे. टाटा ग्रुपची वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ येणार आहे. यासंदर्भातील डीआरएचपी सेबीकडे सोपवण्यात आला आहे.
2/6
मनीकंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार टाटा कॅपिटलच्या लिस्टींगची स्ट्रॅटेजी यास व्यवसायासंदर्भातील संवेदनशील माहितीची सुरक्षा निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
3/6
टाटा कॅपिटल ही एक गैर वित्तीय सेवा कंपनी असून टाटा सन्सची उपकंपनी आहे. टाटा कॅपिटलनं आयपीओ लिस्टींगसाठी 10 गुंतवणूक बँकांची निवड केली आहे. यात कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी, जेपी मॉर्गन, एक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्यूरिटीज, एचएसबीसी सिक्यूरिटीज, आईआईएफएल कॅपिटल, बीएनपी पारिबा, एसबीआई कॅपिटल आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे.
4/6
टाटा कॅपिटलकडून 15 हजार कोटींचे नवे शेअर जारी केले जातील. याशिवाय टाटा सन्सकडून ऑफर फॉर सेलद्वारे काही शेअरची विक्री करेल.या कंपनीत टाटा सन्स या कंपनीची भागिदारी 92.83 टक्के आहे. कंपनीला 2.3 कोटी नवे शेअर जारी करण्यास मंजुरी मिळाली आहे. टाटा सन्स आणि टाटा कॅपिटलचा यांना आरबीआयच्या निर्णयानुसार सप्टेंबर 2025 पूर्वी बाजारात लिस्ट व्हावं लागेल. टाटा कॅपिटलचा गेल्या वर्षातील महसूल 18178 कोटी रुपये होता.
5/6
टाटा कॅपिटलचा नफा 3150 कोटी रुपये इतका झाला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत टाटा कॅपिटलची कामगिरी चागंली राहिली आहे. या काळात कंपनीचा नफा 21 टक्के वाढला आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 05 Apr 2025 09:31 PM (IST)