Tata Group च्या 'या' कंपनीची मोठी घोषणा, 57 रुपये प्रतिशेअर लाभांश जाहीर, गुंतवणकदारांसाठी मोठी अपडेट
TCS Dividend : टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसनं त्यांच्या शेअर धारकांना एकूण 57 रुपयांचा लाभांश प्रति शेअर जाहीर केला आहे.

टीसीएस शेअर
1/5
मुंबई : टाटा ग्रुपची कंपनी टीसीएसनं त्यांच्या शेअरधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीनं अंतरिम आणि विशेष लाभांश जाहीर केला आहे. यामुळं गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे.
2/5
टीसीएसनं लाभांशामध्ये दोन पॅकेजचा समावेश केला आहे. ज्यात 11 रुपयांचा अंतरिम लाभांश आणि 46 रुपयांचा विशेष लाभांश याचा समावेश आहे.
3/5
गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 57 रुपये लाभांश मिळणार आहे. टीसीएसच्या शेअरची दर्शनी किंमत 1 रुपये आहे म्हणजेच लाभांश 5700 टक्के होते. यासाठी कंपनीनं रेकॉर्ड डेट 17 जानेवारी निश्चित केली आहे आणि लाभांश पेमेंट करण्याची तारीख 3 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
4/5
आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 14 टक्क्यांनी कमी होत 10657 कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीत नफा 12340 कोटी होता. कंपनीची तिसऱ्या तिमाहीतील उलाढाल 67087 कोटी होती.
5/5
टीसीएसचा शेअर बीएसईवर 3235.70 रुपयांवर बंद झाला. कंपनीचं बाजारमूल्य 1170704.58 कोटी आहे. गेल्या एक महिन्यात टीसीएसच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 12 Jan 2026 11:57 PM (IST)