Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tejas Networks Share : टाटा ग्रुपची कंपनी तेजस नेटवर्कच्या शेअरमध्ये बीएसईवर 7.81 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या तेजस नेटवर्कचा स्टॉक 377.60 रुपयांवर आहे.

टाटा ग्रुपच्या 'या' स्टॉकमध्ये घसरण
1/6
टाटा ग्रुपची कंपनी तेजस नेटवर्कच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीकडून तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर तेजस नेटवर्कचा शेअर 7 टक्क्यांनी घसरला आणि 52 आठवड्यांच्या निचांकावर पोहोचला आहे.
2/6
आज बाजार बंद झाला तेव्हा तेजस नेटवर्कचा शेअर 9.48 टक्क्यांच्या घसरणीसह 377.60 रुपयांवर पोहोचला आहे. तेजस नेटवर्कचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1150 रुपये आहे. तर, 52 आठवड्याचा निचांक 364.25 रुपये आहे. तेजस नेटवर्कच्या स्टॉकनं आज 52 आठवड्यांचा निचांक गाठला आहे.
3/6
देशांतर्गत पातळीवर टेलीकॉम गियर बनवणारी कंपनी तेजस नेटवर्क्सला आर्थिक वर्ष 2025- 26 तिसऱ्या तिमाहीत 196.5 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे.
4/6
मात्र, गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 165.67 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीला मुख्य नुकसान विक्रीतील घसरणीमुळं झालं आहे.
5/6
तेजस नेटवर्क्स सीडॉट-टीसीएस कन्सोर्टियमचा एख भाग म्हणून सरकारी कंपनी बीएसएनलच्या 4G नेटवर्कसाठी महत्त्वाचा वेंडर आहे. याशिवाय नेटवर्क राऊटरचा मोठा पुरवठादार म्हणून काम करते.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 12 Jan 2026 05:08 PM (IST)