Tata Capital च्या बोर्डाचा आयपीओ लाँच करण्यास ग्रीन सिग्नल, टाटांच्या 'त्या' स्टॉकमध्ये तेजीचा ट्रेंड
Tata Capital IPO Plans : टाटा कॅपिटलचा आयपीओ आणण्यास कंपनीच्या बोर्डानं मंजुरी दिल्यानंतर शेअरमध्ये टाटांच्या एका कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.

टाटा कॅपिटल
1/6
टाटा ग्रुपची एनबीएफसी कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे. टाटा कॅपिटलच्या बोर्डानं आयपीओ लाँचिंगला मंजुरी दिली आहे. टाटा कॅपिटल आयपीओच्या माध्यमातून पैसे जमवेल. यामध्ये सध्याचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलद्वारे भागिदारी विकतील. विद्यमान गुंतवणूकदारांच्या शेअरची विक्री करुन 1504 कोटी रुपये उभारले जाणार आहेत.
2/6
टाटा कॅपिटलच्या बोर्डानं आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे. आयपीओद्वारे कंपनी 23 कोटी नवे शेअर जारी करणार आहे. याशिवाय ऑफर फॉर सेलचा देखील यात समावेश असेल.
3/6
टाटा कॅपिटल आयपीओच्या माध्यमातून 15000 कोटी रुपये उभारु शकते. आयपीओ लाँच झाल्यानंतर कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याचा मार्ग मोकळा होईल.
4/6
टाटा कॅपिटल आयपीओ येण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. टाटा इन्वेस्टमेंटचा शेअर 10 टक्क्यांनी वाढून 6321 वर पोहोचला आहे.
5/6
टाटा कॅपिटलचा आयपीओ सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या नियमानुसार सप्टेंबर 2025 पूर्वी टाटा सन्स, टाटा कॅपिटलला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करणं आवश्यक आहे. टाटा कॅपिटलमध्ये 93 टक्के भागिदारी टाटा सन्सकडे आहेत.
6/6
टाटा ग्रुपनं नोव्हेंबर 2023 मध्ये टाटा टेक्नोलॉजीजचा आयपीओ आणला होता. 30 नोव्हेंबर 2023 रोजी स्टॉक एक्सचेंज वर टाटा टेक्नोलॉजीजचा आयपीओ लिस्ट झाला होता. या कंपनीच्या आयपीओचा किंमतपट्टा 500 रुपये निश्चित केला होता. मात्र 140 टक्क्यांच्या तेजीसह आयपीओ 1200 रुपयांवर लिस्ट झाला होता. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Feb 2025 03:08 PM (IST)