Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीवर घसरणीचं सत्र कायम, बँक आणि मेटल शेअरनं तारलं, आयटी कंपन्यांचं नुकसान, 38 हजार कोटी कोणी कमावले?
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले आहेत. बीएसईचं बाजारमूल्य 38 हजार कोटी रुपयांनी वाढलं आहे.

शेअर बाजारात घसरण
1/5
भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दविशी घसरण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबत व्यापार करणाऱ्यांवर 25 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिल्यानं भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला.
2/5
सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि मेटल स्टॉक्सनं भारतीय शेअर बाजाराला आधार दिला. तर, आयटी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. पीएसयू बँक आणि मेटल स्टॉक्सचे निफ्टी निर्देशांक 2-2 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. निफ्टी आयटी 1 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाला.
3/5
मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये खरेदीचा ट्रेंड दिसून आला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 38 हजार कोटी रुपयांनी वाढलं आहे. 13 जानेवारीला बीएसईचं बाजारमूल्य 4,67,79,972.28 कोटी रुपये होतं. त्यात 38 हजार कोटी रुपयांची वाढ होऊन 46818729.20 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
4/5
सेन्सेक्समध्ये आज 244.98 अंकांची घसरण होऊन ते 83382.71 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 मध्ये 66.70 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 25665.60 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सवरील 12 कंपन्या आज तेजीसह बंद झाल्या. ज्यात टाटा स्टील, एनटीपीसी, एक्सिस बँक, टिसीएस, मारुती सुझुकीमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.
5/5
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 4344 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. त्यापैकी 2017 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 2150 शेअर घसरणीसह बंद झाले. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 Jan 2026 05:26 PM (IST)