Share Market Today : गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटींचं नुकसान, सेन्सेक्स 386 अंकांनी घसरला, सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात घसरण
Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. जोरदार विक्रीमुळं सेन्सेक्स 386 अंकांनी घसरला. निफ्टी 50 मध्ये देखील घसरण झाली.

शेअर बाजारात घसरण
1/6
Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज विक्रीचं सत्र जोरदार राहिल्यानं सेन्सेक्स 386 अंकांनी घसरला. तर निफ्टी 50 निर्देशांक 25100 अंकांच्या खाली आला. यामुळं आज गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले. कमजोर जागतिक संकेत आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळं बाजारात घसरण पाहायला मिळाली.
2/6
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या इक्विटी मूल्यांकनाबाबत केलेल्या वक्तव्यांचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला आहे. बाजाराचं सत्र संपलं तेव्हा सेन्सेक्स 386.47 अंकांनी घसरुन 81715.63 अंकांवर बंद झाला. बीएसई मिडॅकप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांकात देखील घसरण झाली.
3/6
FMCG क्षेत्र सोडून इतर सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सर्वाधिक घसरण आयटी, मिडिया, मेटल, ऑईल अँड गॅस आणि रिअल इस्टेट च्या शेअरमध्ये पाहायला मिळाली. हे निर्देशांक 0.5 टक्के ते 2 टक्क्यांपर्यंत घसरले.
4/6
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 24 सप्टेंबरला 460.55 लाख कोटींवर आलं आहे. मंगळवारी हे बाजारमूल्य 463.59 लाख कोटी रुपये इतकं होतं. म्हणजेच बीएसईीरल कंपन्यांचं बाजारमूल्य 3.04 लाख कोटींनी घसरलं आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांची संपत्ती 3.04 लाख कोटी रुपयांनी घसरण झाली आहे.
5/6
बीएसई सेन्सेक्सवरील 30 पैकी 9 शेअर मध्ये तेजी पाहायला मिळाली. पॉवर ग्रीडच्या स्टॉकमध्ये 1.63 टक्के तेजी पाहायला मिळाली. यानंतर हिंदुस्तान यूनिलीवर, एनटीपीसी, मारुती सुझुकी आणि एचसीएल टेक च्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर घसरणीसह बंद झालेल्या शेअरची संख्या 2565 इतकी आहे. तर, 1604 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर, 151 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 24 Sep 2025 05:13 PM (IST)