Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
Share Market Today : भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीनंतर घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 40 अंकांनी घसरला.
Continues below advertisement

शेअर बाजारात घसरण
Continues below advertisement
1/6
भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात दिवसभर तेजी आणि घसरण सुरु होती. सेन्सेक्स 40.28 अंकांच्या घसरणीसह 84233.64 अंकांवर बंद झाला. निफ्टी 18.70 अंकांनी घसरुन 25953.85 अकांवर बंद झाला.
2/6
जागतिक बाजारातील संमिश्र संकेताच्या पार्श्वभूमीवर निफ्टीनं 26 हजारांचा टप्पा पार केला होता. मात्र, त्यानंतर निफ्टीत घसरण झाली. अमेरिकन जॉब मार्केटच्या रिपोर्टवर गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.
3/6
शेअर बाजारात सर्वाधिक तेजी ऑटो निर्देशांकात पाहायला मिळाली. निफ्टी फार्मा, पीएसयू बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे आयटी निर्देशांक 1.7 टक्क्यांनी घसरला. निफ्टी मिडकॅप आमि स्मॉलकॅपन निर्देशांक सपाट राहीला.
4/6
बीएसई सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 474.89 लाख कोटी रुपये झालं आहे. मंगळवारी सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 474.48 लाख कोटी होतं. म्हणजेच बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 41000 कोटींनी वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी एका दिवसात 41000 कोटींची कमाई केली आहे.
5/6
बीएसई सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी 14 शेअर तेजीसह बंद झाले. तर, 16 शेअरमध्ये घसरण झाली. सर्वाधिक तेजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये दिसून आली. मारुती सुझुकी, इंडिगो, ट्रेंट, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये देखील तेजी दिसून आली.
Continues below advertisement
6/6
सेन्सेक्सवरील 16 शेअर घसरणीसह बंद झाले. यात सर्वाधिक घसणर टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, इटरनल, आयटीसीच्या शेअरमध्ये झाली. बीएसईवर 4383 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1971 शेअर तेजीसह बंद झाले तर 2251 शेअरमध्ये घसरण झाली. 161 शेअर मध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 11 Feb 2026 05:12 PM (IST)