Stock Market : मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. यामुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
Continues below advertisement

शेअर मार्केट अपडेट
Continues below advertisement
1/6
भारतीय शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली आहे. आशियाई बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे.
2/6
सकाळी 11.40 वाजता सेन्सेक्स 1422.56 अकांच्या तेजीसह 75499.44 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 50 निर्देशांक 446 अंकांच्या तेजीसह 23361 अंकांवर पोहोचला आहे.
3/6
भारतीय शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.83 लाख कोटींची वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 4.83 लाख कोटींनी वाढून 427 लाख कोटींवर पोहोचलं आहे.
4/6
24 मार्चला बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 422 लाख कोटींवर होतं. आजच्या शेअर बाजारातील तेजीमुळं बीएसईचं बाजारमूल्य 427 लाख कोटींवर पोहोचलं आहे.
5/6
बीएसईवर आज 2491 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं, यापैकी 1862 शेअरमध्ये तेजी दिसून आली तर 483 शेअरमध्ये घसरण झाली. 146 शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही. 17 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला तर 61 शेअरनं 52 आठवड्यांचा नीचांक गाठला.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Mar 2026 12:04 PM (IST)