Share Market : शेअर बाजारात तेजीचा षटकार, सेन्सेक्स 187 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची एका दिवसात 1 लाख 40 हजार कोटींची कमाई
Share Market Today: भारतीय शेअर बाजारात 22 एप्रिलला सलग सहाव्या दिवशी तेजी कायम राहिली. सेन्सेक्स 187 अकांच्या तेजीसह बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 24150 अंकांवर बंद झाला.

भारतीय शेअर बाजारात तेजीचा षटकार
1/6
एकिकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्यावर हल्लाबोल केल्यानं अमेरिकन मार्केट कोसळलं. दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी तेजी सुरु आहे. सेन्सेक्स 187 अंकांनी वाढून बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 24150 अंकांवर पोहोचला आहे.
2/6
स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये तीज पाहायला मिळाली. बीएसई स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 1.39 लाख कोटी रुपयांनी वाढलं. सर्वाधिक तेजी बँकिंगच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली.
3/6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या लिक्विडिटी कवरेज रेशोच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँकिंग सेक्टरबाबत विश्लेषक सकारात्मक दिसून आले. यूबीएसच्या एका रिपोर्टनंतर एफएमसीजी शेअरमध्ये तेजी दिसून आली.
4/6
बीएसईवर लिस्ड असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 427.24 लाख कोटींवर पोहोचलं आहे. सोमवारी म्हणजेच 21 एप्रिलला बाजारमूल्य 425.85 लाख कोटी रुपयांवर होतं. त्यामध्ये आज 1.39 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईवर 4130 शेअर पैकी 2470 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. 150 शेअरच्या किमतीत बदल झाली नाही. तर, 1510 कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली.
5/6
बीएसईवरील 30 पैकी 15 शेअर तेजीसह बंद झाले. सर्वाधिक तेजी आयटीसीच्या शेअरमध्ये दिसून आली. आयटीसीचा शेअर 2.58 टक्क्यांनी वाढला. याशिवाय हिंदूस्थान यूनिलीवर, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इटर्नलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 22 Apr 2025 04:36 PM (IST)