Sensex Crash : शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे, सेन्सेक्स 961 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले
Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात 27 फेब्रुवारीला मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 961 अंकांनी तर निफ्टी 317 अंकांनी घसरला.
Continues below advertisement

शेअर मार्केट क्रॅश
Continues below advertisement
1/6
भारतीय शेअर बाजारात 27 फेब्रुवारीला मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 961 अंकांनी तर निफ्टी 50 मध्ये 317 अंकांची घसरण झाली. जागतिक बाजारातील कमजोर संकेत, भू राजनैतिक तणाव, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री याचा परिणाम बाजारावर दिसून आला.
2/6
आज दुपारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 961.42 अंकांनी घसरुन 81287.19 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 317.90 अंकांनी घसरुन 25178.65 अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांनी घसरले.
3/6
शेअर बाजारात सर्वत्र घसरण पाहायला मिळाली आयटी आणि मीडिया निर्देशांक सोडून इतर सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो, बँक, एफएमसीजी, मेटल, रिअल्टी, टेलिकॉम क्षेत्रातील निर्देशांकात 1-2 टक्के घसरण जाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1 ते2 टक्क्यांनी घसरला.
4/6
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 468.49 लाख कोटींवरुन 463.51 लाख कोटींवर आलं. म्हणजेच बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 4.98 लाख कोटी रुपयांनी घटलं आहे.
5/6
बीएसई सेन्सेक्सवर एचएसीएल टेक, ट्रेंट इन्फोसिस, इटरनल, एनटीपीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, सन फार्मा, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, इंडिगोच्या शेअरमध्ये घसरण झाली.
Continues below advertisement
6/6
बीएसई सेन्सेक्सवर 4369 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. त्यापैकी 1666 शेअर तेजीसह बंद झालं. तर, 2521 शेअरमध्ये घसरण झाली. 182 शेअर तेजी किंवा घसरणीसह बंद झाले. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 27 Feb 2026 07:30 PM (IST)