Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स- निफ्टीमध्ये वाढ, गुंतवणूकदार मालामाल
Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 309 अंकांच्या तेजीसह 77 हजारांच्या पुढे गेला. निफ्टी देखील 23 हजारांच्या पुढे पोहोचली आहे.

शेअर बाजारात तेजी
1/5
भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. आज (बुधवार, 16 एप्रिल) सेन्सेक्समध्य आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 309.40 अकांच्या वाढीसह 77044.29 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 108.65 अंकांच्या वाढीसह 23437.20 अंकांवर बंद झाला.
2/5
सेन्सेक्स मंगळवारी 1600 अंकांच्या तेजीसह 76734.02 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 23328.50 पर्यंत पोहोचला होता. अमेरिकेनं टॅरिफला स्थगिती दिल्यानं त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
3/5
रुपया देखील सलग तिसऱ्या सत्रात मजबूत झाला. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 85.68 वर बंद झाला. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भरतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. आजच्या सत्रात बँकिंग, टेलिकॉम आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअरला फायदा झाला.
4/5
बीएसई स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये देखील 1 टक्के तेजी पाहायला मिळाली. इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये 7.12 टक्के तेजी आली. एक्सिस बँक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये ती दिसून आली. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 2.76 लाख कोटींनी वाढून 415 लाख कोटी झाली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.76 लाख कोटींची वाढ झाली आहे.
5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 16 Apr 2025 08:01 PM (IST)