Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात सलग पाच दिवस घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 2000 अंकांची घसरण झाली आहे. तर, निफ्टीत पाच दिवसात अडीच टक्के घसरण झालीय.

शेअर बाजारात घसरण
1/7
भारतीय शेअर बाजारासाठी हा आठवडा निराशाजनक राहिला आहे. गेल्या पाच दिवसात सेन्सेक्स 2200 अंकांनी घसरला. आज सेन्सेक्स 604 अंकांनी घसरुन 83576 अंकांवर आला तर निफ्टी 193 अंकांनी घसरुन 25683 अंकांवर बंज झाला. निफ्टी बँकमध्ये 435 अंकांची घसरण झाली.
2/7
बीएसई टॉप 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्याचे शेअर घसरणीसह बंद झाले. तर, केवळ 9 शेअर तेजीसह बंद झाले. गेल्या पाच दिवसात सेन्सेक्स आणि निफ्टीत झालेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं 13 लाख कोटींचं नुकसान झालं.
3/7
भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात घसरण होणं आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका 500 टक्के टॅरिफ आकारणार आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये धास्तीचं वातावरण आहे.
4/7
बीएसईचं बाजारमूल्य पाच दिवसात 13.37 लाख कोटी रुपयांनी घसरलं आहे. काल बीएसईचं बाजारमूल्य 472.25 लाख कोटी होतं, त्यात एका दिवसात 4.38 लाख कोटी रुपयांनी घसरण झाली आहे.
5/7
अमेरिकन सिनेटर लींडसे ग्रॅहम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावरील निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजरी दिली आहे. त्यानंतर ते विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टॅरिफ लादलं जाईल. विदेशी गुंतवणूकदारांनी सलग पाच दिवस भारतीय शेअर बाजारातील विक्रीचं सत्र सुरु ठेवलं आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 8 जानेवारीला 3367.12 कोटी रुपये काढून घेतले.
6/7
जागतिक बाजारातील कमजोरी, आशिया बाजारातील घसरण आणि प्रलंबित असलेला अमेरिका- भारत व्यापारी करार याचा परिणाम शेअर बाजारावर झाला.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 09 Jan 2026 06:30 PM (IST)