SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, नेमकं काय घडलं?
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. बँकेनं चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले त्यानंतर शेअर घसरले.
Continues below advertisement

स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
Continues below advertisement
1/6
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये साडे सहा टक्क्यांची घसरण झाली. बँकेच्या शेअरमधील घसरण चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर झाली आहे. बँकेची कामगिरी अपेक्षेप्रमाणं न झाल्यानं शेअर घसरले. बँकेनं निकाल जाहीर करण्यासोबत लाभांश जाहीर केला.
2/6
बीएसईवर स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर सकाळी 1093 रुपयांवर होता. शेअरमध्ये 6.62 टक्क्यांची घसरण झाली. बँकेचा शेअर 72.25 रुपयांनी घसरुन 1019.55 रुपयांवर आला.
3/6
आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत बँकेचा नफा 19684 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर विचार केल्यास नफा 5.6 टक्क्यांनी वाढला आहे. बँकेनं नफा 20312 कोटी रुपये होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
4/6
बँकेची व्याजातून होणारी निव्वळ कमाई 4.1 टक्क्यांनी वाढून 44380 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी 42618 कोटी रुपये होती.
5/6
स्टेट बँक ऑफ इंडियानं चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर करताना लाभांश जाहीर केला आहे. बँकेनं एका शेअरला 17.35 रुपये लाभांश जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड डेट 16 मे निश्चित केली आहे. या तारखेपूर्वी ज्यांच्याकडे एसबीआयचा शेअर असेल, त्याला लाभांश मिळेल.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 08 May 2026 09:25 PM (IST)