India US Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड करार; तेल खरेदीवर रशियाने मांडली भूमिका
India US Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड करार तेल खरेदीवर रशियाने मांडली भूमिका

भारत-अमेरिका व्यापार करारावर रशियाने ट्रम्प यांचा दावा फेटाळला
1/10
भारत-अमेरिका व्यापार करारावर रशियाने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
2/10
भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली, हा ट्रम्प यांचा दावा रशियाने फेटाळला.
3/10
रशियाच्या मते भारताने ऊर्जा धोरणात मोठा बदल केल्याचे कोणतेही संकेत नाहीत.
4/10
ट्रम्प स्वतंत्र भारतावर व्यापाराबाबत दबाव टाकत असल्याचा आरोप रशियाने केला.
5/10
रशिया-भारत ऊर्जा सहकार्य दोन्ही देशांसाठी फायदेशीर असल्याचे मॉस्कोने स्पष्ट केले.
6/10
भारत कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास स्वतंत्र असल्याचे क्रेमलिनने सांगितले.
7/10
भारताने रशियन तेल खरेदी बंद केल्याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
8/10
ट्रम्प यांनी भारत-अमेरिका करारामुळे टॅरिफ कमी झाल्याचा दावा केला होता.
9/10
पंतप्रधान मोदी यांनी फक्त टॅरिफ कपातीची माहिती सोशल मीडियावर दिली.
10/10
भारताची ऊर्जा नीति ही त्याची स्वतःची असून बाह्य दबावाने ती बदलणार नाही, असे रशियाने स्पष्ट केले.
Published at : 05 Feb 2026 01:52 PM (IST)