RBI : आरबीआयचा धमाका सुरुच, तीन बँकांवर मोठी कारवाई, लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काल अहमदाबादमधील कलर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली होती. आज नियमांचं पालन न करणाऱ्या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयचा तीन बँकांना दणका
1/5
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमांचं पालन करताना काही त्रुटी ठेवल्यानं कोटक महिंद्रा बँक,आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेवर लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे.
2/5
आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेला कर्ज प्रणाली संदर्भातील मार्गदर्शक सूचनांशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स , वैधानिक आणि काही प्रतिबंधांवर काही दिशा निर्देशांचं पालन न केल्या प्रकरणी 61.4 लाख रुपयांचा दंड लावला आहे.
3/5
आयडीएफसी फर्स्ट बँकेवर केवायसी नियमांचं पालन न केल्या प्रकरणी 38.6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
4/5
पंजाब नॅशनल बँकेला ग्राहक सेवेसंदर्भातील काही मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं 29.6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन बँकांच्या प्रकरणात आरबीआयनं नियमाक शिस्तीच्या पालनात त्रुटी ठेवल्यानं दंड ठोठावल्याचं म्हटलं.
5/5
आरबीआयनं कालच अहमदाबादमधील कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला होता. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानं ही कारवाई करण्यात आली होती.
Published at : 17 Apr 2025 11:54 PM (IST)