Paytm Payments Bank: आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द, नेमकं कारण काय?
RBI : आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ठेवीदारांचं नुकसान टाळण्यासाठी आरबीआयनं ही कारवाई आवश्यक असल्याचं म्हटलं.

आरबीआयचा मोठा निर्णय
1/6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 24 एप्रिल म्हणजे आज पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडविरोधात कारवाई केलीआहे. आरबीआयनं या पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना तात्काळ रद्द केला आहे. आरबीआयनं हा निर्णय बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 22(4) द्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करत आरबीआयनं घेतला आहे.
2/6
पेटीएम पेमेंट्स बँकेचं कामकाज सुरु राहणं हे सार्वजनिक हितासाठी, ठेवीदारांसाठी नुकसान करणारं ठरु शकतं. या पेमेंट्स बँकेचं कामकाज ज्या प्रमाणं सुरु त्यामुळं ठेवीदारांना नुकसान सहन करावं लागू शकलं असतं.पेटीएम पेमेंट्स बँक त्यांना ज्या अटींसह परवाना दिला होता, त्याचं पालन करण्यात ते अपयशी ठरल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
3/6
पेटीएम पेमेंट्स बँकिंग रेग्यूलेशन कायद्याच्या कलम 22 (3) विविध निमयांचं पालन करु शकलेली नाही.आरबीआयच्या आदेशानंतर पेटीएम पेमेंटस बँकेला हायकोर्टात कामकाज बंद करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
4/6
आरबीआयनं पेटीएम पेमेंट बँकेला 11 मार्च 2022 ला नव्या ग्राहकांची खाती उघडण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर 2024 च्या सुरुवातीला ठेवी आणि क्रेडिट संदर्भात मनाई करण्यात आली होती.
5/6
तज्ज्ञांच्या मते पेटीएम पेमेंट्स बँकेत जमा असलेल्या ठेवीदारांनी घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेकडे त्यांच्या ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पुरेसे पैसे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
6/6
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचं कामकाज 24 एप्रिल 2026 या दिवशी कामकाज संपल्यानंतर बँकिंग संदर्भातील कामकाज बंद करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, पेटीएमच्या शेअरमध्ये आज घसरण पाहायला मिळाली आहे. पेटीएमचा शेअर 1153 रुपयांवर होता.
Published at : 24 Apr 2026 08:39 PM (IST)