रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे 'रेल नीर'च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त
केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच नागरिकांना मोठी भेट देत जीएसटी कपातीचा निर्णय घेतला आहे. केंद्राचा हा निर्णय येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने ग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे.
Continues below advertisement
Railway reduce rate rail neer water bottle GST
Continues below advertisement
1/9
केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच नागरिकांना मोठी भेट देत जीएसटी कपातीचा निर्णय घेतला आहे. केंद्राचा हा निर्णय येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने ग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे.
2/9
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विविध वस्तूंच्या खरेदीवर, गाड्यांच्या खरेदीवर ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. त्यातच, आता भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पाणी बॉटलच्या दरातही कपात करण्यात आलीय.
3/9
रेल्वे विभागाने ट्रेन आणि रेल्वे स्टेशनमध्ये विकल्या जाणाऱ्या रेल नीर या बॉटलबंद पाणीच्या विक्री दरातही कपात केली आहे. त्यामुळे, प्रवाशांना आता 15 रुपयांची एक लिटरची पाणी बॉटल 14 रुपयांत मिळेल. तर 10 रुपयांची अर्धा लिटरची पाणी बॉटल 9 रुपयांना मिळणार आहे.
4/9
रेल्वे स्थानकावरील वेंडरांकडून सातत्याने पाणी बॉटलसाठी आगाऊ पैसे घेतल्याची ओरड पाहायला मिळते. 15 रुपयांच्या बॉटलसाठी 20 रुपये आकारले जात असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
5/9
आता, रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार 15 रुपयांची रेल नीर पाणी बॉटल 14 तर अर्धा लिटरची 10 रुपयांची पाणी बॉटल 9 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे, प्रवाशांना निश्चितच लाभ होईल.
Continues below advertisement
6/9
भारतीय रेल्वेनं यासंदर्भातील निर्णय घेतल्याने लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. ग्राहकांना जीएसटी कपातीचा लाभ पोहोचविण्यासाठी हा लाभ देण्यात आल्याचे रेल्वेने म्हटलं आहे.
7/9
रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. मात्र, या ट्विटला काही ग्राहकांनी, प्रवाशांनी रिप्लाय करत अद्यापही काही वेंडर्संकडून 15 रुपयांऐवजी 20 रुपये आकारले जात असल्याची तक्रार केली आहे.
8/9
रेल्वेने प्रवास करणाऱ्या दैनिक प्रवाशांची संख्या मोठी असून ती कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळे, दररोज रेल नीरची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे.
9/9
रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवासी ग्राहकांना लाभ होणार आहे. मात्र, वेंडरकडून नव्या दरात पाणी बॉटल उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्यानंतर ग्राहक आणि वेंडर यांच्यात बाचाबाची होणार हे निश्चित
Published at : 20 Sep 2025 06:36 PM (IST)