Share Market : NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर, चौथ्या तिमाहीत नफा 22 टक्क्यांनी वाढला
NTPC: एनटीपीसीनं मार्च तिमाहीत 7897.14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढला आहे.

एनटीपीसीकडून लाभांश जाहीर
1/6
सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी एनटीपीसीनं मार्च तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 22 टक्क्यांनी वाढून 7897.14 कोटी रुपये झाल्याचं जाहीर केलं.
2/6
एनटीपीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 2023-24 च्या मार्च तिमाहीत 6490.05 कोटी रुपयांचा निव्वळ नफा जाहीर केला आहे.
3/6
एनटीपीसीचा महसूल 47628.19 कोटी रुपयांवरुन 49833.70 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा 2024-25 चा निव्वळ नफा 2395.15 कोटी रुपये झाला आहे. जो 2023-24 मध्ये 21332.45 कोटी रुपये होता.
4/6
कंपनीच्या संचालक मंडळानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 3.35 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. कंपनीनं यापूर्वी जानेवारीत अंतरिम लाभांश 2.50 रुपये दिला होता.
5/6
एनटीपीसीचा शेअर शुक्रवारी 344.50 रुपयांवर होता. गेल्या 3 महिन्यात शेअर 5.69 टक्क्यांनी वाढला. वार्षिक आधारावर स्टॉक 7.47 टक्क्यांनी घसरला आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 24 May 2025 11:34 PM (IST)