Nirmala Sitharaman Saree Look 2026 : स्टाईल नाही, संदेश आहे! निर्मला सीतारमण यांच्या कांजीवरम साडी बजेट लुकमागचा अर्थ नेमका काय?
Nirmala Sitharaman Saree Look 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर्षी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याचबरोबर त्यांच्या बजेट डे साडीची परंपराही नवी ओळख ठरली आहे.

Nirmala Sitharaman Saree Look 2026
1/9
दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी भारतातील लोकांचं लक्ष केवळ देशाच्या अर्थसंकल्पावरच नसतं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत जाताना कोणती साडी परिधान करतात याकडेही सगळ्यांचं लक्ष असतं.
2/9
गेल्या काही वर्षांपासून सतत अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारमण यांची साडी विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
3/9
लोक त्यांच्या साडीकडे फक्त फॅशन म्हणून पाहत नाहीत, तर भारताच्या समृद्ध वस्त्रपरंपरेचं आणि विविध प्रादेशिक हस्तकलेचं प्रतीक म्हणूनही पाहतात.
4/9
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर्षी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याचबरोबर त्यांच्या बजेट डे साडीची परंपराही नवी ओळख ठरली आहे. या साड्या केवळ परिधानासाठी नसून, त्या भारतीय कलेचं आणि सांस्कृतिक अभिमानाचं प्रतीक मानल्या जातात.
5/9
यंदा बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी हातमागावर विणलेली मरुन रंगाची कांजीवरम सिल्क साडी परिधान केली आहे. ही साडी तमिळनाडूच्या पारंपरिक विणकाम कलेचं प्रतीक आहे.
6/9
या साडीत हलक्या सोनेरी-तपकिरी रंगाचे चेक्स आहेत आणि कडेला कॉफी ब्राउन रंगाची बॉर्डर देण्यात आली आहे. जांभळ्या रंगाच्या शॉलसोबत निर्मला सीतारमण यांनी आपला लूक पूर्ण केला आहे.अर्थमंत्री स्वतः तमिळ असल्याने त्यांनी आपल्या गृह राज्याची साडी परिधान केली आहे.
7/9
बजेटच्या दिवशी निर्मला सीतारमण यांच्या साड्या विशेष मानल्या जातात. याचं कारण म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या या साड्या राष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या कारीगरीला ओळख मिळवून देतात.
8/9
प्रत्येक साडी एखाद्या विशिष्ट विणकाम केंद्राला, कारागीर समुदायाला आणि पारंपरिक तंत्रज्ञानाला सन्मान देणारी असते. यापैकी अनेक विणकाम शैलींना जीआय टॅग आणि आंतरराष्ट्रीय ओळखही मिळाली आहे.
9/9
निर्मला सीतारमण यांनी आपल्या साड्यांमागील अर्थ कधीही सार्वजनिकरित्या स्पष्ट केला नसला, तरी फॅशन तज्ज्ञ आणि जाणकारांच्या मते त्यांच्या या निवडी हातमाग उद्योगाला आणि ग्रामीण उपजीविकेला पाठबळ देणारा एक शांत सांस्कृतिक संदेश देतात.
Published at : 01 Feb 2026 11:16 AM (IST)