Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
Multibagger Stock : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना सहा महिन्यात मालामाल केलं आहे. तर, 5 वर्षात या स्टॉकनं 718.36 टक्के रिटर्न दिले आहेत.
शेअर मार्केट अपडेट
1/6
सरकारी कंपनी हिंदूस्थान कॉपरच्या शेअरमध्ये सोमवारी (05 जानेवारी 2026) ला मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. या स्टॉकनं गेल्या सहा महिन्यात गुंतवणूदारांना दुप्पट परतावा दिला आहे. यामुळं स्टॉकचं मल्टीबॅगर स्टेटस मजूबत केलं. बीएसईवर शेअर 2.01 टक्क्यांनी वाढून 552.80 रुपयांवर बंद झाला आहे.
2/6
हिंदूस्थान कॉपरच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यात 101.35 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये 48.66 टक्के तेजी दिसून आली आहे. तर, एका वर्षात 134.60 टक्के तेजी आली आहे. तर, 5 वर्षात स्टॉकनं 718.36 टक्के रिटर्न दिले आहेत.
3/6
जागतिक बाजारात तांब्याच्या दरात वाढ झाल्यानं हिंदूस्थान कॉपरच्या स्टॉकमध्ये मजबुती दिसून येत आहे. मात्र, बीएसई आणि एनएसईनं हिंदूस्थान कॉपरच्या स्टॉकला शॉर्ट- टर्म अॅडिशनल सर्विलान्स मेजर फ्रेमवर्क टाकलं आहे.
4/6
बाजार जाणकारांच्या मते हिंदूस्थान कॉपरच्या स्टॉकमधील तेजीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता आवश्यक आहे. वेल्थ मिल्स सिक्यूरिटीजमधील इक्विटी स्ट्रॅटजी संचालक क्रांती बथिनी यांनच्या मते स्टॉकमध्ये जोरदार रॅली दिसून आली आहे. शॉर्ट टर्म ते मिडियम टर्म गुंतवणूकदार नफा वसूल करु शकतात. तर, दीर्घकालीन गुंतवणूकदार अंशत: नफा बुक करु शकतात.
5/6
टिप्स टू ट्रेडस च्या सेबी नोंदणीकृत विश्लेषक ए आर रामचंद्रन यांच्या मते हिंदूस्थान कॉपरचा स्टॉक डेली चार्टवर बुलिश आहे. तर, ओवरबॉट झोनमध्ये पोहोचला आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 05 Jan 2026 11:22 PM (IST)
= 6">