LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC : सरकारी विमा कंपनी एलआयसीनं आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. एलआयसीच्या कामगिरीबाबत नवी माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement

एलआयसी
Continues below advertisement
1/6
सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारच्या मालकीची विमा कंपनी एलआयसीनं मार्च तिमाहीत वित्तीय क्षेत्रातील सर्वाधिक नफा मिळवणारी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. मार्च तिमाहीत एलआयसीला 23420 कोटींचा नफा झाला आहे.
2/6
जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीत एलआयसीचा निव्वळ नफा 23 टक्क्यांनी वाढून 23420 कोटी रुपये झाला आहे. एलआयसीचा जानेवारी ते मार्च 2025 या तिमाहीतील नफा 19013 कोटी रुपये इतका होता.
3/6
एलआयसीकडून चौथ्या तिमाहीचे आणि वार्षिक कामगिरीचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर 23 मे रोजी शेअरमध्ये तेजी दिसून आली. एलआयसीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ होऊन ते 839 रुपयांवर पोहोचले आहेत. एलआयसीकडील AUM म्हणजेच असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 57,29,396 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीला प्रीमिअमद्वारे मिळालेल्या उत्पन्नात देखील 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. समायोजित नेटवर्थ वाढून 169605 कोटी रुपये झाली आहे.
4/6
शेअर बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाचा मार्च तिमाहीतील नफा 19684 कोटी रुपये होता. तर, खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेचा नफा 19221 कोटी रुपये आहे.
5/6
आर्थिक वर्ष 2025-26 चा वार्षिक आधारावर विचार केल्यास स्टेट बँकेनं एलआयसीला मागं टाकलं आहे. स्टेट बँकेचा वार्षिक निव्वळ नफा 80032 कोटी रुपये आहे. तर, एलआयसीचा निव्वळ नफा 57419 कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँकेचा वार्षिक निव्वळ नफा 74670 कोटी रुपये आहे. आयसीआयसीआय बँकेला 2025-26 मध्ये 50147 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 24 May 2026 06:52 PM (IST)