तुमच्या पाच-पन्नास हजारांचं काय घेऊन बसलात, शेअर मार्केट कोसळल्याने एलआयसीला प्रचंड नुकसान, आकडा वाचून कोलमडून पडाल
LIC Share Update : शेअर बाजारातील घसरणीमुळं एलआयसीला देखील मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. एलआयसीला दीड महिन्यात मोठं नुकसान झालंय.

एसआयसीला मोठं नुकसान
1/10
भारतीय शेअर बाजारात विविध कारणांमुळं घसरण सुरु आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम म्हणजे एलआयसीला देखील मोठा फटका शेअर बाजारातील घसरणीचा बसला आहे. गेल्या दीड महिन्यातील शेअर बाजारातील घसरणीमुळं एलआयसीला84000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. याबाबतचं वृत्त इंग्रजी दैनिक बिझनेस स्टँडर्डनं दिलं आहे.
2/10
डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत एलआयसीची लिस्टेड कंपन्यांमधील गुंतवणूक 14.72 लाख कोटी रुपयांची होती. जी आता 18 फेब्रुवारीपर्यंत 13.87 लाख कोटी रुपये राहिली आहे. म्हणजेच एलआयसीला 84000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय.
3/10
एलआयसीनं ज्या 330 कंपन्यांमध्ये 1 टक्क्यांपेक्षा अधिक भागिदारी घेतली आहे. त्यातील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचं समोर आलं आहे.
4/10
एलआयसीची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांपैकी आयटीसीला 11863 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. एल अँड टीला 6713 कोटी रुपयांचं नुकसान झालं तर एसबीआयला5647 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. या तीन कंपन्यामुळं एलआयसीच्या एकूण नुकसानापैकी 29 टक्के नुकसान झाल्याचं समोर येतं.
5/10
टीसीएस, जिओ फायन्शिअल सर्विसेस, एसीएल टेक्नोलॉजीज, जेएसडबल्यू एनर्जी, अदानी पोर्टस, एचडीएफसी बँक, आयडीबीआय बँकांना देखील 2000 कोटी ते 4000 कोटींची घसरण झाली आहे.
6/10
एलआयसीच्या पोर्टफोलिओतील सर्वाधिक घसरण फायनान्शिअल सेक्टरमध्ये झाली आहे. बँकिंग अँड फायनान्शिअल 18385 कोटी रुपये, आयटी सेक्टर 8981 कोटी ,इन्फ्रास्ट्रक्चर 8313 कोटी, पॉवर सेक्टर 7193 कोटी, फार्मा क्षेत्राला 4591 कोटींचा फटका बसला आहे.
7/10
एलआयसीला बजाज फायनान्स, मारुती सूझुकी, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय कार्ड मुळं एलआयसीच्या पोर्टफोलिओत 1 ते 3 हजार कोटींची वाढ झाली आहे. रिलायन्स आणि टीसीएसनं देखील एलआयसीला 840 कोटी मिळवून दिले.
8/10
जोपर्यंत भारतीय कंपन्यांची कमाई स्थिर होत नाही तोपर्यंत भारतीय बाजाराचं बाजारमूल्य दबावात राहिल त्यामुळं गुंतवणूकदारांना लवकर दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे, असं जाणकारांनी म्हटलं.
9/10
दरम्यान, एलआयसीला 2024-2025 च्या तिसऱ्या तिमाहीत 11056.5 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.
10/10
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 19 Feb 2025 12:12 PM (IST)