LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
LIC Disinvestment : भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीमधील भागिदारी सरकार पुन्हा एकदा विकणार आहे. यासाठी सरकार योग्य वेळेची वाट पाहतंय.

एलआयसी न्यूज
1/7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीमधील भागिदारी केंद्र सरकार टप्प्या टप्प्यानं कमी करणार आहे. 2 वर्षांपूर्वी एलआयसीनं आयपीओ आणल्यानंतर सरकार पुन्हा एकदा 2 ते 3 टक्के भागिदारी विकणार आहे.
2/7
केंद्र सरकार सेबीच्या नियमाची पूर्तता करण्यासाठी मे 2024 पर्यंत एलआयसीमधील भागिदारी 10 टक्क्यांनी कमी करणार आहे. यासाठी पुन्हा एकदा आयपीओ आणला जाऊ शकतो.
3/7
केंद्र सरकारकडे सध्या एलआयसीची मालकी 96.5 टक्के आहे. एलआयसीनं मे 2022 मध्ये आयपीओ आणून 3.5 टक्के भागिदारी विकली होती. केंद्राला अजून 6.5 टक्के भागिदारी विकायची आहे.
4/7
केंद्रानं एलआयसीच्या आयपीओच्या माध्यमातून 21000 कोटी रुपयांची उभारणी केली होती. सरकारनं पुन्हा एकदा 3 टक्के भागिदारी विकण्याची तयारी केली आहे. यामुळं सरकार 9500 कोटी ते 14500 कोटी रुपयांची उभारणी करु शकते. एलआयसीचं बाजारमूल्य सध्या 4.8 लाख कोटी आहे. जे आयपीओ आणल्यानंतर घटलं होतं.
5/7
सेबीच्या नियमानुसार एलआयसीमधील केंद्राची भागिदारी मे 2024 पर्यंत भागिदारी 10 टक्के कमी करायची होती. म्हणजेच केंद्राची भागिदारी 90 टक्क्यांपर्यंत आणायची होती. मात्र, त्याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. सरकार आता 6.5 टक्के कमी करण्यासाठी दोन टप्पे करु शकते.
6/7
एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर त्याचं बाजारमूल्य घसरलं आहे. मे 2022 मध्ये एलआयसीचं बाजारमूल्य 5.5 लाखकोटी होतं, ते आता 4.8 लाख कोटी झालंय. कंपनीला जवळपास 70 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. एलआयसीचा शेअर सध्या 754.10 रुपयांवर ट्रेड करतोय.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 13 Mar 2025 08:08 AM (IST)