एक्स्प्लोर
LIC ची मोठी घोषणा, 'या' सार्वजनिक बँकेतील भागीदारी वाढवली, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी
LIC raised stake in BOB : भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीनं बँक ऑफ बडोदामधील भागीदारी वाढवली आहे. यामुळं बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
एलआयसीनं सार्वजनिक बँकेतील भागीदारी वाढवली
1/6

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयीनं सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदामधील भागीदारी 2 टक्क्यांनी वाढवली आहे. यामुळं एलआयसीची बँकेतील भागीदारी 7.05 टक्के झाली आहे. एलआयसीनं शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षात खुल्या बाजारातून 10.45 कोटी अतिरिक्त शेअर खरेदी केले आहेत.
2/6

20 नोव्हेंबर 2023 ते 16 एप्रिल 2025 या काळात एलआयसीनं बँक ऑफ बडोदामधील भागीदारी 5.03 टक्क्यांवरुन 7.05 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. दुसरीकडे बँकेत मार्च 2025 अखेरपर्यंत सरकारची भागीदारी 63.97 टक्के आहे.
3/6

बँक ऑफ बडोदाच्या शेअरमध्ये सोमवारी (21 एप्रिल) रोजी शेअरमध्ये 3 टक्के तेजी दिसून आली. बीएसईवर शेअर 249.65 रुपयांवर आहे. बँकेचं बाजारमूल्य 1.29 लाख कोटी रुपये आहे. बँकेचा शेअर गेल्या एका महिन्यात 15 टक्क्यांनी तर एका आठवड्यात 7 टक्क्यांनी वाढला आहे.
4/6

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदानं देखील व्याज दरात 0.25 टक्के कपात केली आहे. रिटेल आणि एमएसएमई क्षेत्रातील कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.
5/6

बँक ऑफ बडोदानं आतापर्यंत आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली नाही. बँकेला ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत निव्वळ नफा 4837.34 कोटी इतका झाला होता.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 21 Apr 2025 04:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























