ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : केंद्र सरकारनं तंबाखूजन्य उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी लावला आहे. त्याशिवाय उत्पादनशुल्क वाढण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आयटीसीच्या शेअरवर झाला आहे.

आयटीसीमुळं सरकारी कंपन्यांना फटका
1/5
सिगारेटवरील उत्पादन शुल्क आणि जीएसटी केंद्र सरकारनं वाढवल्यानंतर सलग दोन दिवस आयटीसीच्या शेअरमध्ये 14 टक्क्यांची घसरण झाली आहे. याचा फटका एलआयसीला बसला आहे. 2 जानेवरी आयटीसीचा शेअर 5 टक्क्यांनी घसरुन 52 आठवड्यांच्या निचांकावर पोहोचला आहे. आयटीसीचा शेअर 345.25 रुपयांवर पोहोचला आहे.
2/5
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील शेअर होल्डिंगच्या पॅटर्ननुसार आयटीसीची 100 टक्के भागीदारी पब्लिक शेअर होल्डर्सकडे आहे. फक्त एलआयसीकडे 15.86 टक्के भागीदारी आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे 1.73 टक्के, द न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लिमिटेडकडे 1.4 टक्के भागीदारी आहे.
3/5
आयटीसीच्या शेअरच्या विक्रीमुळं एलआयसीचं 11468 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 31 डिसेंबरला एलआयसीची आयटीसीतील गुंतवणुकीची रक्कम 80028 कोटी रुपये होती. 2 जानेवारीला ती रक्कम 68560 कोटी रुपये राहिली आहे. आयटीसीच्या शेअरमधील घसरणीमुळं तीन सरकारी विमा कंपन्यांचं 13740 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एलआयसीचं नुकसान 11460 कोटी रुपयांचं झालं आहे.
4/5
आयटीसीच्या शेअरमध्ये 2 जानेवारीला 4 टक्के घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसात आयटीसीच्या शेअरमध्ये 14 टक्के घसरण झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यात 15 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आह. यामुळं कंपनीचं बाजारमूल्य 72 हजार कोटींनी घटली आहे. कंपनीचं बाजारमूल्य 438639 कोटी रुपये आहे. स्टॉकचं पी ई गुणोत्तर 22.59 आहे
5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 03 Jan 2026 11:46 PM (IST)