Iran Israel War : इराण-इस्त्रायल संघर्षामुळं शेअर बाजार कोसळला, SIP सुरु ठेवणं की बंद करण योग्य? तज्ज्ञ म्हणतात...
Iran Israel War: अमेरिका, इस्त्रायल आणि इराक यांच्या संघर्षामुळं शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 1048 अंकांची घसरण झाली.
Continues below advertisement
बाजारात घसरण, एसआयपीचं काय करायचं?
Continues below advertisement
1/7
Iran Israel War नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. आखाती देशांमध्ये भूराजनैतिक तणाव वाढल्यानं जगभरातील बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं. निफ्टी 50 निर्देशांक 300 अंकांपेक्षा अधिक अंकांनी घसरला. तर, सेन्सेक्समध्ये 1048 अंकांची घसरण झाली.
2/7
कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील घसरण हा चिंतेचा विषय झालेला आहे. भारतात सक्रीय एसआयपी खात्यांची संख्या 9.92 कोटी आहे. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये तोटा दिसत असल्यानं अनेक जण एसआयपी बंद करण्याबाबत विचार करु शकतात.
3/7
जेव्हा बाजारात मोठी घसरण होते तेव्हा गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता वाढते. एसआयपी हा शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रकार आहे. दीर्घकालीन कंपाऊंडिग टूलप्रमाणं याकडे पाहिलं पाहिजे. ऐनवेळी एसआयपी थांबवण किंवा बंद करणं तोट्याचं ठरु शकतं. अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूक सुरु ठेवली पाहिजे.
4/7
फॉर्चुना असेट मॅनेजर्सचे भागीदार आशीष आनंद यांच्या मते बाजारीतल घसरण इक्विटी गुंतवणुकीचा सर्वसाधारण भाग आहे. जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा एसआयपीद्वारे कमी किंमतीत अधिक यूनिट खरेदी करता येतात.
5/7
क्रेशा गुप्ता यांच्या मते भूराजनैतिक तणावाच्या दरम्यान भारतीय बाजारात सर्वसाधारणपणे 5 ते 10 टक्के घसरण पाहयला मिळते.यापूर्वीची आकडेवारी पाहिली असते 3 ते 6 महिन्यात परिस्थिती पूर्वपदावर येते.
Continues below advertisement
6/7
विजय माहेश्वरी यांच्या मते तुम्ही तुमचा गुंतवणूक कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता याचा आढावा घ्या. 6 ते 12 महिन्यांच्या खर्चाची रक्कम आपत्कालीन खर्च म्हणून तयार ठेवा. त्यामुळं बाजारात घसरण असताना तुम्हाला गुंतवणूक कमी करावी लागणार नाही. क्रेशा गुप्ता यांच्या मते बाजारात घसरण होते तेव्हा गुंतवणूक थांबवणं दीर्घकालीन गुंतवणुकीच्या क्षमतेला नुकसान पोहोचवू शकतं. त्यामुळं घाबरण्याऐवजी गुंतवणुकीत शिस्त कायम ठेवणं आवश्यक आहे.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 02 Mar 2026 10:44 PM (IST)
= 7">