NSE Nifty 50 : निफ्टी 50 कमबॅक करणार, 26000 चा टप्पा ओलांडणार,नुकसानाच्या वणव्यात होरपळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण
NSE Nifty 50 : NSE Nifty 50 : नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील निफ्टी 50 निर्देशांक 22553 अंकापर्यंत खाली घसरला आहे. भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं सत्र कायम राहिल्यानं गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

निफ्टी 50 कमबॅक करणार
1/6
भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून घसरण सुरु आहे. गुंतवणूकदारांना यामुळं मोठा फटका बसला आहे. निफ्टी 50 मध्ये घसरण होऊन निर्देशांक 22553 अंकांपर्यंत पोहोचला आहे. या स्थितीत ग्लोबल ब्रोकरेज फर्म सिटीनं मोठी भविष्यवाणी केली आहे. निफ्टी 50 इंडेक्स डिसेंबरपर्यंत 26000 अंकांपर्यंत पोहोचू शकतो.
2/6
ब्रोकरेज फर्म सिटीनं भारतासंदर्भातील अंदाजाला अपग्रेड करत न्यूट्रलवरुन ओवरवेट केलं आहे. भारतीय शेअर बाजाराचं मूल्यांकन आकर्षक होण्यस मदत होईल. भारतीय शेअर बाजारात तेजी येण्यासंदर्भातील अनेक कारणं सिटीनं सांगितली आहे.
3/6
सिटीच्या मतानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर आकारणीत देण्यात आलेल्या सवलतीमुळं भारतात खरेदी वाढेल, असा अंदाज आहे. खर्चात वाढ होईल. सरकार विकास दर वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी खर्च करतंय, असं सिटी फर्मनं म्हटलं.
4/6
ब्रोकरेज हाऊसनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की आरबीआयनं फेब्रुवारीच्या सुरुवातीला रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं घसरला आहे. येत्या काळात रेपो रेट 50 बेसिस पॉईंटनं कमी केला जाण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था देशांतर्गत घटकांमुळं प्रभावित होते, असंही सिटी फर्मनं म्हटलं.
5/6
गेल्या पाच सत्रांमध्ये निफ्टी 50 निर्देशांक 406 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1542 अंकांची घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणानं जागतिक बाजारांमध्ये तणाव वाढला आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Feb 2025 11:20 AM (IST)