LPG gas cylinder shortage: केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना दिलासा; कमर्शिअल एलपीजीबाबत महत्त्वाचा निर्णय
LPG gas cylinder shortage: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर संकट ओढावले आहे.

LPG gas cylinder shortage
1/8
देशांतर्गत गॅस उत्पादनात सुधारणा झाल्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असून, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी व्यावसायिक एलपीजीच्या वाटपात अतिरिक्त 20 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता एकूण वाटप 50 टक्क्यांवर पोहोचले आहे.
2/8
पश्चिम आशियात तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे भारताचा ऊर्जापुरवठा विस्कळित झाला होता. त्यामुळे घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हॉटेलसारख्या व्यावसायिक आस्थापनांच्या पुरवठ्यात सुरुवातीला कपात करण्यात आली होती. त्यानंतर, 20 टक्के पुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि राज्यांनी पाइप गॅस प्रकल्पांना गती दिल्यास अतिरिक्त 10 टक्के कोटा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
3/8
व्यावसायिक एलपीजी टंचाईचा मुंबई, पुणे व परिसरातील व्यावसायिक आस्थापनांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेकांनी आठवड्यातील पाच दिवस हॉटेल बंद ठेऊन केवळ शनिवार, रविवारी सुरू ठेवले आहे. काही रेस्टॉरंट्समध्ये मेन्यूत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सेवा मर्यादित ठेवणे किंवा तात्पुरती बंद करण्याची वेळ हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि कॅफेचालकांवर आली आहे.
4/8
मुंबई आणि पुण्यातील सुमारे 10 ते 15टक्के हॉटेल पूर्णपणे बंद झाली आहेत, तर अनेक हॉटेल मर्यादित मेन्यूवर सुरू आहेत. गॅस मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेक हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी आठवड्यातील पाच दिवस हॉटेल बंद ठेऊन केवळ ‘वीकएंड’ला सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
5/8
अनेकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे, तर चुलीचा पर्यायही काहींनी स्वीकारला आहे. गॅसबचतीसाठी हॉटेलालकांनी वेळखाऊ पदार्थ बंद केले आहेत. मेन्यू कमी केला असून, केवळ जलद तयार होणारे पदार्थ ठेवले आहेत.
6/8
image 5
7/8
शनिवारी सरकारने रेस्टॉरंट, हॉटेल, औद्योगिक कँटीन, अन्न प्रक्रिया युनिट, सार्वजनिक स्वयंपाकघरे आणि अनुदानित खाद्य केंद्रांसारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी 20 टक्के वाढीव वाटपाची घोषणा केली. सर्व रिफायनरीज पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे.
8/8
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published at : 22 Mar 2026 03:15 PM (IST)