Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement

सोने दर बातम्या
Continues below advertisement
1/5
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सुरुवातीच्या कारभारात सोने आणि चांदीच्या दरात एक टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. कमजोर जागतिक संकेतांमुळं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.29 जुलै रोजी फेड रिझर्व्ह पतधोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी डॉलर निर्देशांक 101.5 वर पोहोचला आहे. यामुळं सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांमध्ये नफावसुलीचा ट्रेंड दिसत आहे.
2/5
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑगस्टच्या वायद्याचे सोन्याचे दर 1144 रुपयांनी घसरुन 141913 रुपयांवर आले. तर, सप्टेंबरच्या चांदीच्या वायद्याचे दर 3892 रुपयांनी घसरुन 217297 रुपयांवर आले.
3/5
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिका आणि इराण यांच्यातील हल्ले प्रतिहल्ले थांबल्यानं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे.
4/5
इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून देशभरातील सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. आयबीजेएच्या माहितीनुसार सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 144466 रुपये होता. त्यामध्ये घसरण होऊन आज एका तोळ्याचा दर 142559 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच आज एका तोळे सोन्याचा दर 1907 रुपयांनी घटला आहे.
5/5
22 कॅरेट सोन्याचा दर देखील कमी झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा 27 जुलैचा दर 132331 रुपयांवर होता. त्यामध्ये आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आजचा 22 कॅरेट सोन्याचा दर 130584 रुपये आहे. म्हणजेच आज 22 कॅरेट सोनं 1747 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाली. 27 जुलै रोजी एक किलो चांदीचा दर 224447 रुपये होता. आज तो दर 217904 रुपयांवर आला आहे. आज चांदी 6543 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Continues below advertisement
Published at : 28 Jul 2026 03:45 PM (IST)