एक्स्प्लोर
सोन्याचांदीचा घसरता ट्रेंड पाहून खरेदीला जाताय? आधी 24 अन् 22 कॅरेटचा दर चेक करा, मुंबई-पुण्यात...
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने नरमाई पाहायला मिळत आहे. कुठे काय भाव आहे? १० ग्रॅममागे किती पैसे दयावे लागतायत? वाचा
Gold Rate Today
1/8

काही दिवसांपूर्वी लाखांचा टप्पा उलांडून पुढे गेलेल्या सोन्याच्या भावात गेल्या 7 दिवसांपासून घसरण सुरू आहे .
2/8

सोन्याचा हाच घसरता ट्रेंड जुलै महिन्याच्या सुरुवातीलाही दिसून येतोय . एक जुलैला 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम मागे दर हा 97,410 होता . आज 2 जुलै रोजी हा दर 97,330 एवढा झाला आहे .
3/8

एक जुलै रोजी चांदीचा प्रति किलो दर एक लाख 7 हजार 700 रुपये एवढा झाला होता . आज (2 जुलै) रोजी चांदी एक लाख 6 हजार 500 रुपयांवर पोहोचली आहे .
4/8

22 कॅरेट सोन्यासाठी आज मुंबईच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम मागे 89 हजार 219 रुपये खरेदीदारांना मोजावे लागत आहेत .तर 18 कॅरेट सोनं 72 हजार 998 रुपयांवर गेलंय .
5/8

पुणे, नागपूर, ठाणे,नाशिक अशा बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्यासाठी 97 हजार 280 (प्रति 10 ग्रॅम ) रुपये मोजावे लागत आहे .
6/8

डॉलर निर्देशांकातली घसरण,महागाईतील घट, आर्थिक आणि भूराजकीय तणावात घट, किरण इजराइल मधील तणाव कमी होणे अशी अनेक कारणे या सोन्याच्या घसरणे मागे सांगितली जात आहेत .
7/8

गेल्या दहा दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण दिसून आली आहे. हे दर दररोजच्या आधारावर ठरवले जातात आणि यामागे अनेक घटक जबाबदार असतात.
8/8

उदा. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, क्रूड ऑईलचे दर, इम्पोर्ट ड्युटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यांचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होतो.
Published at : 02 Jul 2025 02:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर


















