एक्स्प्लोर
Gold Rate : भारत पाकिस्तानमधील तणाव वाढताच, सोन्याच्या दरात मोठी वाढ, पुन्हा एकदा 1 लाखांचा टप्पा ओलांडला
Gold Price : पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवर भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक केला. या द्वारे भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. याचा परिणाम सोने दरावर झाला.
सोन्याचे दर पुन्हा एक लाखांवर
1/5

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानं सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी नवी दिल्लीत सोन्याचे दर 1000 रुपयांनी वाढून एक लाख रुपयांवर पोहोचले.
2/5

अखिल भारतीय सर्राफा संघानं दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचे दर 1000 रुपयांनी वाढून 100750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळावरी हे दर 99750 रुपयांवर होते.
3/5

सोन्याचे दर 22 एप्रिलला 1800 रुपयांनी वाढून 101600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले.
4/5

99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या दरात 1050 रुपयांची वाढ झाल्यानं ते 1,00,350 रुपयांवर पोहोचलं. मंगळवारी या सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 99300 रुपये होता. जागतिक बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ झाली. हाजिर सोन्याचा दर 3369.65 डॉलर प्रति औंस इतका आहे.
5/5

दुसरीकडे चांदीच्या दरात देखील 440 रुपयांची वाढ झाली. चांदीचे दर 98940 रुपये प्रति किलो झाले आहेत. मंगळवारी चांदीचे दर 98500 रुपये प्रति किलो इतके होते.
Published at : 07 May 2025 09:42 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















