Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात तेजी आणि घसरणीचं सत्र कायम आहे. सोने दरात आज तेजी पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Continues below advertisement

सोने दरात वाढ, चांदीच्या दरात घसरण
Continues below advertisement
1/5
मुंबई: इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या दरांनुसार सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
2/5
24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 143656 रुपयांवर होता. आज त्यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. एक तोळे सोन्याचा दर 143815 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचा दर 131589 रुपयांवरुन 131735 रुपयांवर पोहोचला आहे.
3/5
आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार एक किलो चांदीचा दर 9 जुलै 2026 रोजी 223794 रुपये होता. आज सकाळी जारी करण्यात आलेल्या दरांनुसार एक किलो चांदीचा दर 222014 रुपये इतका आहे. म्हणजेच आज एक किलो चांदीचा दर 1780 रुपयांनी कमी झाले आहेत.
4/5
आयबीजेएच्या दरांनुसार सोने दरात वाढ झाली असली तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ऑगस्टच्या वायद्याचे दर 144861 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर, सप्टेंबरच्या वायद्याचे चांदीचे एक किलोचे दर 226137 रुपयांवर आले आहेत.
5/5
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात दबाव पाहायला मिळाले. सिंगापूरमध्ये सकाळी 8.18 वाजता स्पॉट गोल्डचे दर 4123.22 डॉलर प्रति औंस वर होते. तर, चांदीचे दर 59.91 डॉलर प्रति औंस होते.
Continues below advertisement
Published at : 10 Jul 2026 01:08 PM (IST)